You are currently viewing कुडाळ नगरपंचायत कारभाराविरोधात प्रजासत्ताकदिनी सहा उपोषणे

कुडाळ नगरपंचायत कारभाराविरोधात प्रजासत्ताकदिनी सहा उपोषणे

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्रशासन अपयशी; गणेश भोगटे

कुडाळ

येथील नगरपंचायती विरोधात प्रजासत्ताक दिनी वेगवेगळी सहा उपोषणे छेडली जाणार आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात उपोषण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी नगरपंचायतीचा कारभार वेशीवर टांगला, अशी टीका स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी केली. दरम्यान तत्कालीन नगराध्यक्षांनी नगरपंचायतीचा कारभार यशस्वीपणे हाताळला होता. मात्र आताचे सत्ताधारी त्यांच्या विरोधातील आंदोलनावरूनच नागरिकांना न्याय मिळवून देऊ शकत नाहीत हे सिद्ध झाले, असा आरोपही त्यांनी केला. याबाबत श्री.भोगटे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर मागील १० ते १२ वर्षापासून अखंडित कामे करीत आहोत. वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडली आहे. वेळेवर कामे पूर्ण करीत आहोत. कोविड १९ कालावधीत सुद्धा नियमित कार्यरत राहून काम केले. सुरक्षिततेसाठी कोणतीही शासकीय योजना नसताना स्वतःचा जीव धोक्यात घालून योजने अंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

मागील तीन ते चार वर्षापासून आम्हा कंत्राटी कर्मचारी यांच्या मानधनात कोणतीही वाढ झालेली नाही. राज्यातील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन मधून मानधन देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर आम्हाला मानधन व नियुक्ती देण्यात यावी. गेल्या आर्थिक वर्षात पीएम आणि एमआयएस यांचे मानधन १४ ते १५ हजार रुपयांनी वाढले आहे. मात्र, आमच्या मानधनात वाढ झालेली नाही. त्यामुळे मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करावे. पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे. आम्हा सर्वांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी. ग्राम रोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. मध्यप्रदेश शासन प्रमाणे वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १८ रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात होते. त्यानंतर आज २५ पासून असहकार आंदोलन पुकारून लेखणी, आढावा सभा, अहवाल, ऑनलाईन या कामांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही शासनाने मागण्या मान्य न केल्यास १ फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनोने यांच्याकडे देण्यात आले. यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विवेक तिरोडकर, तांत्रिक सहाय्यक विवेक शिरसाट, क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर रजनी सावंत, तांत्रिक सहाय्यक अमित जाधव, क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर तुषार पांचाळ, तांत्रिक सहाय्यक प्रशांत धुरी आदींसह असंख्य डाटा एंट्री ऑपरेटर व अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =