You are currently viewing कोकण इतिहास परिषदेचे अधिवेशन १७ फेब्रुवारी रोजी ठाण्यात

कोकण इतिहास परिषदेचे अधिवेशन १७ फेब्रुवारी रोजी ठाण्यात

वैभववाडी

कोकण इतिहास परिषदेचे १२ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन यंदा ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना काॅलेजच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी,२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्ताने अधिवेशनात ‘कोकण आणि मुंबईचा स्वातंत्र लढ्यातील सहभाग’ या विषयावर शोध निबंध सादर केले जाणार आहेत. पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ.श्रद्धा कुंभोजकर अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत. तसेच यावेळी राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे माजी कार्यकारी संपादक डॉ.शरदचंद्र फाटक यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत विविध सत्रांमध्ये अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात कोकणातील औद्योगिक विकास, पर्यटन व व्यापार क्षेत्रातील वाटचाल व भविष्यातील संधी या विषयांवर शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. २०२२ मध्ये कोकणातील इतिहासाविषयी प्रसिद्ध झालेल्या संशोधनपर पुस्तकाला अधिवेशनात पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षी कल्याण येथील बिर्ला कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी वार्षिक अधिवेशनात सादर झालेल्या शोधनिबंधांच्या संकलित पुस्तकाचे तसेच कोइपच्या त्रैमासिकाचे प्रकाशन अधिवेशनात करण्यात येणार आहे. तसेच गेल्या वर्षी सादर झालेल्या शोधनिबंधांपैकी उल्लेखनीय दोन शोधनिबंधांना पारितोषिक दिले जाणार आहेत. या अधिवेशनात नाणी प्रदर्शन भरविण्यात जाणार आहे. या परिषदेला सिंधुदुर्गसह कोकण व महाराष्ट्रतील इतिहास प्राध्यापक,अभ्यासक, लेखक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी उपस्थित राहून वरील कोणत्याही एका विषयावर आपला शोधनिबंध सादर करुन अधिवेशनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष श्री.सदाशिव टेटविलकर, सचिव डॉ.विद्या प्रभू, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर, उपाध्यक्ष प्रा. श्री. एस.एन.पाटील व सचिव श्री.प्रविण पारकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − one =