You are currently viewing आगामी निवडणुकांत विरोधकांशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा – काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख 

आगामी निवडणुकांत विरोधकांशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा – काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख 

मालवण तालुका काँग्रेस कमिटीची बैठक

मालवण

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने विरोधकांशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हावे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी ग्वाही राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी येथे बोलताना दिली

मालवण तालुका काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या मालवण फोवकांडा पिंपळ येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी वायरी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या ममता तळगावकार, प्राची माणगांवकर या ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी, आनंद परुळेकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, पल्लवी तारी- खानोलकर, योगेश्वर कुर्ले, श्रेयस माणगांवकर, लक्ष्मीकांत परुळेकर, विरेश देउलकर, श्री. राणे, पराग माणगांवकर, सरदार ताजर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, प्राची माणगांवकर, शोभना चिंदरकर, ऍड. अमृता मोंडकर, महेंद्र मांजरेकर, मेघश्याम लुडबे, दिलीप तळगावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज्यात प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार ‘हात से हात जोडो’ या कार्यक्रमा बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी यांनी तालुका स्तरीय संघटन बाबींवर पुन्हा एकदा गावातील जुन्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संपेल असे वाटत होते, पण जिल्ह्यातील जनआशीर्वाद काही प्रमाणात का असेना जनतेने आम्हाला दिला व आमचे सदस्य देखील ग्रामपंचायत मध्ये निवडून आले, असे यांनी सांगितले

वायरी येथे काँग्रेसचा उपसरपंच देखील बसला ही चांगली मुहूर्त मेढ असुन भविष्यात येणाऱ्या निवडणूका जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा मध्ये देखील पक्षाचे पदाधिकारी यांना चांगली संधी उपलब्ध होईल अशी आशा दिसत असल्याचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीचे नियोजन- सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी केले तर आभार पल्लवी तारी- खानोलकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − one =