You are currently viewing आम. नितेश राणेंच्या उपस्थितीत हडपीड येथील गावविकास पॅनलच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा भाजपात प्रवेश

आम. नितेश राणेंच्या उपस्थितीत हडपीड येथील गावविकास पॅनलच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा भाजपात प्रवेश

*प्रवेशकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत.!*

 

देवगड :

हडपीड गावात ग्रामपंचायत निवडणूक गाव विकास पॅनलच्या माध्यमातून लढवली होती. विजयी झाल्यावर आम. नितेश राणे यांच्या विकासात्मक कामावर आणि निवडणुकांनंतर आम. नितेश राणे यांनी विकास कामांचा आढावा घेत सुरू केलेली विकास कामे याचा प्रत्यक्षात निरीक्षण करून आज आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत हडपीड येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

यावेळी प्रवेशकर्त्यांमध्ये नवनिर्वाचित सरपंच संध्या प्रकाश राणे, उपसरपंच दाजी राणे, सदस्य सुषमा कदम, गणेश राणे, श्रद्धा राणे यांनी आम. नितेश यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांना भाजप पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल तसेच गावच्या विकासासाठी जेवढे काही अपेक्षित आहे तेवढे देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल आणि ते करू असे देखील आम. नितेश राणे यांनी प्रवेशादरम्यान सांगितले.

यावेळी आम. नितेश राणे, संदीप साटम, अमित साटम, प्रकाश पुजारे, प्रकाश राणे, शिवाजी गुरव, मंगेश लोके, शैलजा गुरव, अशोक राणे, गोट्या बिलकर, विश्वनाथ राणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =