You are currently viewing पंचम खेमराज महाविद्यालय वनस्पती शाखा विभागाच्या वतीने कांदळवन वृक्षारोपण..

पंचम खेमराज महाविद्यालय वनस्पती शाखा विभागाच्या वतीने कांदळवन वृक्षारोपण..

सावंतवाडी

समुदाय आधारित परिसंस्था पुनर्वसन या उपक्रमाअंतर्गत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागामार्कत कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

पर्यावरण व आर्थीक दृष्टीकोनातून कांदळवने हा सागरी किनारपट्टी वरील वातावरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. कांदळवनांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.व याच जबाबदारीने वनस्पतीशाळा विभाग स्वामिनी महिला बचत गट आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले बुग्रेरा जिमनोरायझा मिगनोरायझा व ब्रगेरा सिलीड्रीका या दुर्मीळ प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलताना वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम देठे यांनी कांदळवन संवर्धनासाठी स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत मांडले. स्वामिनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष प्रा.सौ. स्वाती हुले यांनी आर्थिक दृष्टीकोनानुन कांदळवनांचे महत्त्व पटवून दिले. वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. निवास देसाई, प्रा. डॉ. उमेश पवार यांंनी कांदळवन परिसंस्था त्यांचे जतन संवर्धन आणि शाश्वत थिकासया विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला वनपाल सागर पांढरे, प्रा. अमोल कांबळे सतीश हुले, बचत गटाच्या महिला सदस्या, व वनस्पतिशास्त्र विभागाचे आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 13 =