मळेवाड येथील “डॉग व कॅट शो” चा लखमराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ…
सावंतवाडी
मळेवाड- कोंडुरे यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे येथील राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड शाळा नं. १ च्या भव्य पटांगणावर सांस्कृतिक ग्रुप डान्स त्याचप्रमाणे “डॉग व कॅट शो” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा शुभारंभ सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. तसेच यावेळी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट, अमोल नाईक, स्नेहल मुळीक, कविता शेगडे, सानिका शेवडे, अर्जुन मुळीक, मधुकर जाधव, गिरिजा मुळीक, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, रोजगार सेवक अमित नाईक, उद्योजक राजा सावंत, माजगाव ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी आदी उपस्थित होते.