You are currently viewing शिरवल सरपंच गौरी वंजारे तर उपसरपंच पदाचा प्रविण तांबे यांनी पदभार स्वीकारला ….

शिरवल सरपंच गौरी वंजारे तर उपसरपंच पदाचा प्रविण तांबे यांनी पदभार स्वीकारला ….

उपसरपंच निवड प्रक्रिया झाली बिनविरोध ; उपसरपंचपदी प्रविण तांबे

शिरवल गावच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – गौरी वंजारे..

कणकवली

कणकवली तालुक्यातील शिरवल सरपंच पदाचा गौरी वंजारे तर उपसरपंच पदाचा प्रविण तांबे यांनी पदभार स्वीकारला आहे. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच गौरी वंजारे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. त्यात उपसरपंच पदासाठी प्रविण तांबे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.त्यानंतर शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषाबाजी करत जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला. निवडणूक निर्णय निरीक्षक कुबल तर सभेचे सचिव राजेंद्र गुरव यांनी काम पाहिले.

शिरवल गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहिल.या पुढील काळात गावातील एकही विकासकाम शिल्लक राहणार नाही,सर्वांना सोबत घेऊन आणि विश्वासात घेऊन गावात विविध योजनांच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच गौरी वंजारे यांनी केले.

या सभेला उपसरपंच प्रविण तांबे सदस्य रविकांत उर्फ लवु तांबे, प्रचिती कुडतरकर, अनुष्का सावंत, प्रिती सावंत, चैताली पांचाळ, आदी नूतन सदस्य उपस्थित होते.

यावेळी उद्योजक शंकर पार्सेकर, सीमा पार्सेकर,माजी सरपंच मनोज राणे, शाखा प्रमुख प्रमोद सावंत, प्रमोद नानचे, दत्तात्रय प्रभु पाटकर, अमोल सावंत, अजित सावंत,भाई पार्सेकर,अनिल सावंत, श्रीकृष्ण यादव, दिनकर चव्हाण, संदेश राणे,अजय चौकेकर,बाळकृष्ण वंजारे,प्रशांत कुडतरकर, तुळशीदास कुडतरकर,प्रसाद सावंत,संजय सावंत, राजेंद्र सावंत चंद्रकांत पांचाळ, अमोल कोरगावकर मंगेश तांबे ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा कासले, सखाराम गुरव आदी उपस्थित होते.

फोटो:- शिरवल ग्रामपंचायत सरपंच गौरी वंजारे आणि उपसरपंच प्रविण तांबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना सौ.सीमा पार्सेकर आणि उद्योजक शंकर पार्सेकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + thirteen =