You are currently viewing अभियानातील उणिवा जनतेसमोर मांडल्याबद्दल नार्वेकर यांचे अभिनंदन – शिशिर परुळेकर

अभियानातील उणिवा जनतेसमोर मांडल्याबद्दल नार्वेकर यांचे अभिनंदन – शिशिर परुळेकर

कणकवली

माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या अभियानांतर्गत कणकवली शहरात सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या कामाबाबत नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या सरकारच्या उणिवा जनतेसमोर मांडल्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. कारण हे अभियान राबवत असताना राज्य सरकार कडून स्वयंसेवक म्हणून ज्यांना अभियानात सामावून घ्यायच्या सूचना देण्यात आल्या त्याबाबत कोणती काळजी किंवा खबरदारी घेण्यात यावी याबाबत तरतूद किंवा मार्गदर्शन करण्यात आले नाही. त्यामुळे या अभियानात किती उणिवा आहेत हेच नार्वेकर यांनी नगरपंचायत वर टीका करताना दाखवून दिले. मुळात हे अभियान कणकवली नगरपंचायत राबवत नाही तर नार्वेकर यांचे राज्यात असलेले सरकार राबवत आहे. नगरपंचायत केवळ त्याची सरकारच्या सूचनेनुसार अंमलबजावणी करत आहे. हे नार्वेकर यांना कदाचित समजले नसावे. कणकवली शहरात या अभियानांतर्गत सुरु असलेल्या सर्वेक्षणात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य मिळाले पाहिजे हे नार्वेकर यांचे म्हणणे सत्यच आहे. मात्र ज्यावेळी हे अभियान सरकारकडून सुरू करण्यात आले त्या सरकारकडूनच याबाबत खबरदारी घेण्यात आली नाही. हे देण्याची जबाबदारी सरकारवर होती. यावर नार्वेकर यांनी शिक्कामोर्तब केले. म्हणजे सरकारची अभियान केवळ कागदावरची असून जनतेच्या हिताची नाहीत हे एक प्रकारे मान्य केल्याबद्दल नार्वेकर यांचे अभिनंदन केले पाहिजे. एकीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांवर covid-19 च्या कामाची जबाबदारी असते वेळी या अभियानाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर अजून एक जबाबदारीचे ओझे टाकण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे नगरपंचायत वर आरोप करण्यापेक्षा श्री नार्वेकर यांनी त्यांच्या नेत्यांकडून या स्वयंसेवकांना आवश्यक ती सुरक्षिततेची साधने दिल्यास त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग त्या विद्यार्थ्यांना होईल. व त्यांच्याच सरकारच्या अभियानावर टीका करण्याची ही वेळ नार्वेकर यांच्यावर येणार नाही असेेेेेेेेेेे मत कणकवली नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी मांडले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − fifteen =