You are currently viewing आज जिल्ह्यात विविध शाळांमध्ये ५ वी व ८ वी ची स्कॉलरशिप परीक्षा

आज जिल्ह्यात विविध शाळांमध्ये ५ वी व ८ वी ची स्कॉलरशिप परीक्षा

सिंधुदूर्ग :

राज्यात दहावी आणि बारावीप्रमाणेच इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र 5वी आणि 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षा (5th and 8th Scholarship Exams) घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. यानुसार या पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच 5वी (5th Scholarship Exam) आणि पूर्व माध्यमिक म्हणजेच 8वीच्या (8th Scholarship Exams) शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख 8 ऑगस्ट 2021 होती. मात्र आता ही परीक्षा आज जिल्हातील विविध शाळांमध्ये घेण्यात आली.

यावेळी शाळा प्रशासन यांनी योग्य ती खबरदारी घेऊन ही परीक्षा घेण्यात येत आहे.विध्यार्द्यांची बैठक व्यवस्था ही शासकीय नियमाचे पालन करून करण्यात आली आहे.
याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याचे टेंपरेचर व ऑक्सीगन लेवल तपासून त्यांना आत पाठवत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − eight =