You are currently viewing १८ वर्षे पूर्ण होणा-या व मतदारांनी ग्रामसभेमध्ये बीएलओ मार्फत किंवा व्होटर हेल्पलाईन किंवा NVSP मार्फत आगाऊ फॉर्म नं ६ भरण्याची सुविधा

१८ वर्षे पूर्ण होणा-या व मतदारांनी ग्रामसभेमध्ये बीएलओ मार्फत किंवा व्होटर हेल्पलाईन किंवा NVSP मार्फत आगाऊ फॉर्म नं ६ भरण्याची सुविधा

सिंधुदुर्गनगरी 

 आगामी  वर्ष २०२४ मधील  लोकसभा व विधानसभा  सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने १ मे २०२३ रोजी आयोजित ग्राम सभेतील मतदार यादी वाचन कार्यक्रमांमध्ये सर्व लोकांनी उपस्थित रहावे  व मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमात सर्व पात्र मतदारांनी नाव नोंदणी,  मतदार यादीतील दुरुस्ती करावी. दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणा-या व मतदारांनी ग्रामसभेमध्ये बीएलओ मार्फत किंवा व्होटर हेल्पलाईन किंवा NVSP मार्फत आगाऊ फॉर्म नं ६ भरण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त पात्र भावी मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

             आगामी  वर्ष २०२४ मध्ये  लोकसभा व विधानसभा  सार्वत्रिक  निवडणुका  होणार असून  त्यासाठी मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. मतदार यादी अधिक शुध्द करण्याकरिता दिनांक ५ जानेवारी २०२३  रोजी प्रसिध्द्  झालेल्या  मतदार यादीतील  मयत मतदारांची नावे मतदार  यादीतून वगळण्याची कार्यवाही चालू आहे. तसेच नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता त्यांची मतदार नोंदणीची कार्यवाही चालू आहे.

              यासाठी  दिनांक १ मे  २०२३ रोजी होणा-या  ग्रामसभेच्या  अजेंडयामध्ये  दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द  झालेल्या  मतदार यादीचे वाचन हा विषय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने  सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द झालेली मतदार यादीसह  ग्रामसभेच्या ठिकाणी उपस्थित  रहाणार आहेत. मतदार यादीचे वाचन  झालेनंतर सदर यादीतील मयत  मतदारांची नांवे ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये घेऊन ठरावाच्या प्रतीच्या अनुषंगाने सदर मतदारांची मतदार यादीतून वगळणी करण्यात येणार आहे. तसेच नवमतदार नोंदणीचा कार्यक्रम, मतदार ओळखपत्रातील दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे.

       तसेच वरीलप्रमाणे नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रासाठी तहसिलदार कार्यालय, येथे मतदार यादीचे वाचन नवमतदार नोंदणीचा कार्यक्रम व मतदार ओळखपत्रातील दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी भेटी देण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.

            सद्यस्थितीत भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार ८० वर्षावरील मतदारांची पडताळणी कार्यक्रम व ब्लर फोटोची दुरुस्ती कार्यक्रम चालू आहे. यामध्ये जे मतदार मयत आहेत त्यांची वगळणी, जे मतदार स्थलांतरित आहेत त्यांचा पत्ता बदल व ज्यांचे फोटो जुने किंवा सुस्पष्ट आहेत अशा मतदारांचे नवीन कलर फोटो गोळा करून मतदार यादी अधिक शुद्ध करण्यात येत आहे. तालुकानिहाय झालेल्या कामाचा प्रगतीपर अहवाल खालीलप्रमाणे.

80+ Report
Form 7 Form 8
Name Of Taluka 80_Plus Voters Shifted Expired Photo Correction required No action required Verifcaton Done by BLO
1 2 3 4 5 6 7=3+4+5+6
Devgad 4581 42 708 854 0 1604
Kankvali 6818 12 589 764 0 1365
Vaibhavwadi 2057 13 46 417 0 476
Malvan . 6292 16 197 881 0 1094
Kudal 8261 0 708 1214 0 1922
Vengurla 3710 0 525 1566 0 2091
Sawantwadi 4463 0 831 2516 0 3347
Dodamarg 2421 0 1018 773 0 1791
Total 38603 83 4622 8985 0 13690

 

Blur Photo Report
Form 7 Form 8
1 4 5 6
Name Of Taluka Total Probable Poor Quality Records Records Marked as Poor Quality By ERO Records not Marked as Poor Quality By ERO Shifted Expire any other Reason collected Total Verifcaton Done by BLO
1 0
Devgad 1419 1419 0 56 322 0 378 756
Kankvali 2797 2797 0 0 589 0 52 641
Vaibhavwadi 1332 1332 0 0 39 0 128 167
Total 268 Kankvali 5548 5548 0 56 950 0 558 1564
Malvan . 3394 3394 0 84 426 0 623 1133
Kudal 2922 2922 0 121 479 0 715 1315
Total 269 Kudal 6316 6316 0 205 905 0 1338 2448
Vengurla 758 758 0 0 76 0 289 365
Sawantwadi 698 698 0 2 110 1 181 294
Dodamarg 391 391 0 0 273 0 108 381
Total 270 Sawantwadi 1847 1847 0 2 459 1 578 1040
District Total 13711 13711 0 263 2314 1 2474 5052

प्रतिक्रिया व्यक्त करा