You are currently viewing ओरोस भवानी मंदिरानजीक श्री श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या ताफ्यातील गाडीला अपघात; एकाचा मृत्यू…

ओरोस भवानी मंदिरानजीक श्री श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या ताफ्यातील गाडीला अपघात; एकाचा मृत्यू…

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना;

ओरोस

श्री श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचा ताफा कणकवली येथून कुडाळच्या दिशेने जात असताना ओरोस सावंतवाडा भवानी मंदिर येथे आला असता त्यातील टेम्पो ट्रॅव्हलर पलटी होवून भीषण अपघात झाला. दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी झालेल्या या अपघातात चालक नरसिंहमूर्ती श्रीनिवास राव (वय ४३) यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्यानंतर स्वतः श्री श्री श्री वामनाश्रम स्वामी तेथे थांबून होते. पूर्ण ताफाच त्यांचा थांबलेला होता.

कणकवली वरून कुडाळच्या दिशेने जात असताना कणकवली चातुर्मास मासानिमित्त आलेल्या वामन आश्रम स्वामीच्या गाडींच्या ताफ्यातील ए ए ४७ एम ३६२५ या टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की गाडी रस्त्यावर पलटी झाली होती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या बॅरीकेट्सला ही गाडी आपटली.

यावेळी या मार्गाने प्रवास करणारे बापर्डे गावचे सरपंच संजय लाड, सामाजिक कार्यकर्ते जीवन नाईकधुरे, संतोष दुसनकर व लक्ष्मण परब यांनी इतर लोकांच्या मदतीने गाडीखाली सापडलेल्या डायव्हरला बाहेर काढले. त्यानंतर जखमी तिघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील चालक नरसिंहमूर्ती यांचे उपचारास दरम्यान निधन झाले. तर उदय नायल कुंदापुर उडपी आणि प्रज्वल शेठ तिर्थवाडी कर्नाटक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा