You are currently viewing भिरवंडे गावात शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

भिरवंडे गावात शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

सरपंच नितीन सावंत यांचा स्तुत्य उपक्रम

कणकवली

1 मे महाराष्ट्र दिना निमित्त भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी विठ्ठल दामोदर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करताना वयाच्या 85 व्या वर्षीही शेती करणारे विठ्ठल पवार यांना ध्वजारोहणाचा मान भिरवंडे ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आला.
भिरवंडे ग्रामपंचायत च्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करताना एक वेगळा पायंडा पाडण्यात आला.ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात भिरवंडे बौद्धवाडी येथील ज्येष्ठ नागरिक असलेले शेतकरी विठ्ठल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर केंद्र शाळा भिरवंडे नंबर एक मध्ये ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य व शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका रश्मी रमेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांना सरपंच नितीन सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश घाडीगावंकर, ग्रामसेवक मंगला बिलकुले, सदस्य अंकिता सावंत ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश सावंत ,केंद्रप्रमुख श्री सूर्यवंशी ,मुख्याध्यापक श्रीमती सावंत, शिक्षिक सतीश गोसावी ,सौ.चिंदरकर, सौ. बगळे, पोलीस पाटील बाळकृष्ण सावंत ,सोसायटी संचालक मंगेश सावंत, दीपा सावंत, संदीप सावंत ,राजेश कांबळे ,पूजा सावंत, सीआरपी अमिता सावंत, आरोग्य सेविका शीला कांबळे, अक्षता सावंत ,ग्रामपंचायत कर्मचारी विशाल सावंत, ऋषिकेश सावंत ,शितल राणे दिलीप पवार आदी उपस्थित होते. आपल्याला हा ध्वजारोहणाचा बहुमान दिल्याबद्दल शेतकरी विठ्ठल पवार यांनी आभार मानले तर शेतकरी सन्मानाच्या उपक्रमाविषयीया प्रकाश घाडीगावकर यांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा