You are currently viewing मुंबई विद्यापीठ, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे मॉडेल कॉलेजचे आज उद्घाटन

मुंबई विद्यापीठ, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे मॉडेल कॉलेजचे आज उद्घाटन

भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल महाराष्ट्र राज्य तथा कुलपती महाराष्ट्र राज्य विद्यापीठे यांच्या हस्ते होणार उद्घाटन!

आम. नितेश राणे यांची ही उपस्थिती…!

मुंबई विद्यापीठ, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे मॉडेल कॉलेजचा आज उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असून भगतसिंग कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य तथा कुलपती महाराष्ट्र राज्य विद्यापीठे यांच्या हस्ते या कॉलेजचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल महाराष्ट्र ,आम. नितेश राणे, प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच प्रा. सुहास पेडणेकर कुलगुरू मुंबई विद्यापीठ ,प्रा. रवींद्र कुलकर्णी प्र- कुलगुरू, मुंबई विद्यापीठ डॉ. विनोद पाटील कुलसचिव (प्रभारी), मुंबई विद्यापीठ यांची विशेष उपस्थिती या कॉलेजच्या उद्घाटन प्रसंगी असणार असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा