You are currently viewing पर्यटन क्षेत्रास नवसंजीवनी देण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची नियुक्ती
पर्यटन क्षेत्रास नवसंजीवनी देण्यासाठी स्थापित राज्यस्तरीय टास्क फाेर्समध्ये पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची नियुक्ती

पर्यटन क्षेत्रास नवसंजीवनी देण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची नियुक्ती

पर्यटन क्षेत्रास नवसंजीवनी देण्यासाठी स्थापित राज्यस्तरीय टास्क फाेर्समध्ये पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची नियुक्ती

काेविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेल्या टाळेबंदीच्या कालावधीत राज्यातील पर्यटन क्षेत्रापुढे निर्माण झालेल्या विविध आव्हानांना व समस्यांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आणि या संदर्भातील कृती योजनेवर चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फाेर्सची स्थापना करण्यात आली असून या राज्यस्तरीय टास्क फोर्समध्ये पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या राज्यस्तरीय टास्क फोर्सचे अध्यक्ष पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे असून इंडियन हॉटेल्स लिमिटेडचे पुनित चटवाल, ईस्ट इंडिया हॉटेल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक देवेंद्र भर्मा, हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स चे अध्यक्ष, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, इव्हेंट अँड एंटरटेन्मेंट असोसिएशनचे अध्यक्ष त्याचप्रमाणे इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष फरहात जमाल, अभिनेते सुबोध भावे, सहनिर्माते रितेश सिधवानी, ट्रॅव्हल ट्रेड चे औरंगाबाद प्रतिनिधी सुनित कोठारी, नागपूर प्रतिनिधी हरमनदीप सिंह, सिंधुदुर्ग प्रतिनिधी गाईल्स नॅप्टन हे मान्यवर सदस्य तर सदस्य सचिव म्हणून पर्यटन संचालनालयाचे संचालक यांची या राज्यस्तरीय टास्क फोर्स मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

या टास्क फोर्सची कार्ये पुढीलप्रमाणे असतील, राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाच्या कृती योजनेवर चर्चा करणे, काेविड-19 SOP प्रोटोकॉल, गुंतवणूक आणि विपणन उपक्रम सुचविणे, पर्यटन विकासात सार्वजनिक-खासगी भागीदारी टिकवून ठेवण्यास सहाय्य करणे.
शासनाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 4 =