जिल्हातील गणवंत क्रीडापटू व  मार्गदर्शकांच्या पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत

जिल्हातील गणवंत क्रीडापटू व  मार्गदर्शकांच्या पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी

 महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालय यांच्या निर्देशनानुसार जिल्हा क्रीडा कार्यालयाव्दारे जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांच्या गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने  जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू (1 महिला, 1 पुरुष, 1 दिव्यांग खेळाडू), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक 1 यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. त्याअनुषंगाने या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तीनी 2023-24 साठी विहित नमुन्यातील परिपुर्ण अर्ज 31 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.     

            जिल्हातील उत्कृष्ब्ट खेळाडू व मार्गदर्शक यांच्याकडून सन 2023-24 च्या पुरस्कारासाठी कार्यालयामार्फत  विहित नमुन्यातील परिपुर्ण अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रु.10,000/- असे या बाबींचा समावेश आहे. पुरस्कार हा विभातुन दिला जाणार नाही. पुरस्कारासाठी पात्र अशी व्यक्ती आढळून न आल्यास पुरस्कार घोषीत केला जाणार नाही. तसेच या पुरस्कार मरणोंत्तर दिला जाणार नाही. पुरस्काराबाबतची माहिती पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.

पुरस्कारासाठी पात्र खेळ :  धनुर्विद्या (आर्चरी),  मैदानी क्रीडा स्पर्धा (ॲथलेटिक्स),  बॅडमिंटन, वजन उचलणे (वेटलिफिटंग), बास्केटबॉल, ज्युदो, हॅण्डबॉल, हॉकी, जिम्नॅस्टिक्स, सायकलिंग, तलवारबाजी (फेन्सिंग), फुटबॉल, बॉक्सींग, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस, नेमबाजी, टेबलटेनिस, तायक्वाँदो, कुस्ती (रेसलिंग), जलतरण (स्विमिंग डायव्हिंग, वॉटरपोलो), कयाकिंग/ कॅनोईंग, अश्वरोहण (इक्वेस्टोरीयन), गोल्फ, रोईंग, ट्रायथलॉन, सॉफ्टबॉल, रग्बी, भारोत्तोलन (पावरलिफ्टींग), कबड्डी, क्रिकेट, बिलियर्डस ॲण्ड स्नुकर, स्केटींग, स्क्वॅश, बुध्दीबळ (चेस), वुशू, आटयापाट्या, शरीर सौष्ठव (बॉडीबिल्डींग), यॉटींग, खो-खो, मल्लखांब, कॅरम, मॉडर्न पेटॉथलॉन, बेसबॉल, स्पोर्टस क्लायंबिंग.

पुरस्काराचे संक्षीप्त निकष :-

गुणवंत खेळाडू :- पुरस्काराअंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून यामध्ये 1 महिला खेळाडू, 1 पुरुष खेळाडू व 1 दिव्यांग खेळाडू यांचा समावेश आहे. संबंधित जिल्ह्यामध्ये खेळाडूने लगतपूर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनधित्व केले असले पाहीजे. खेळाडूंची मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य, राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धामधील पुरस्कार वर्षाच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ, कनिष्ठ, शालेय, ग्रामीण व महिला (पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान मधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी  लक्षात घेण्यात येईल. यापैकी उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल. खेळाडूने त्याचा अर्ज विहित नमुन्यात व विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रे जोडून या कार्यालयात सादर करावा. खळाडूने स्पर्धाच्या मुळ प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रति स्वाक्षांकित करुन अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. खेळाडूंचा अर्ज अधिकृत जिल्हा संघटनेमार्फत शिफारास करुन सादर करणे आवश्यक राहील तथापि अपवादात्मक परिस्थितीत खेळाडू वैयक्तिकरित्या अर्ज करु शकतील. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असले पाहिजे. प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने खेळाडूंनी सादर केलेल्या क्रीडा प्रमाणपत्रांचे तपासणी व गुणांकन करुन पात्र खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, जागतिक अजिक्यपद क्रीडा स्पर्धा (वरिष्ठ गट), जागतिक चषक क्रीडा स्पर्धा (वरीष्ठ गट), आशिपाई अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट), राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा (वरिष्ठ गट) युथ ऑलिम्पिक गेम्स, युथ कॉमनवेल्थ गेम्स, युथ जागतिक अजिक्यपद, युथ जागतिक चषक स्पर्धा या अधिकृत, मान्यता प्राप्त खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील खेळाडूंना थेट पुरस्कार देण्यात येईल.

 क्रीडा मार्गदर्शक :- पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य् असले पाहिजे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रात सतत दहा वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरिता त्या जिल्हयातील खेळाडूंची कामगिरी ग्राहय धरली जाईल.  एका जिल्हयामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त्‍ करणारी व्यक्ती राज्यातील अन्य् जिल्हयात जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.  एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा पुरस्कार प्राप्त् केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्काराकरीता अर्ज करण्यात पात्र असणार नाही.  सांघिक अथवा वैयक्तिक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरीष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य/जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक.

            जिल्हा क्रीडा पुरस्कार 2023 करीता विहित नमुन्यातील अर्ज, पुरस्काराच्या अटी व शर्ती इतर माहितीसाठी इच्छुकांनी व्यक्तिश: माहितीसाठी www.dsosindhudurg.blogspot.in किंवा कनिष्ठ लिपिक पंढरीनाथ चव्हान ७७४४८३४१२२ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग मुख्य प्रशासकीय इमारत सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालयीन वेळेत अर्ज प्राप्त करुन घेऊन सदरचे परिपूर्ण अर्ज दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयात सादर करावेत. मुदती नंतर येणारे अर्ज स्विकारण्यात येणार नाही, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  विद्या शिरस यांनी केले आहे.

०००००

प्रतिक्रिया व्यक्त करा