You are currently viewing पेडणे येथे झालेल्या अपघातात पेंडूर मधील युवक ठार…

पेडणे येथे झालेल्या अपघातात पेंडूर मधील युवक ठार…

पेडणे येथे झालेल्या अपघातात पेंडूर मधील युवक ठार…

पेडणे

तालुक्यातील धारगळ सुके कुळण येथे मोटरसायकल व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या धडकेत वेंगुर्ले येथील संजय सुरेश जळवी ( वय ४९, रा. पेंडूर, ता. वेंगुर्ले ) हा तरुण जागीच ठार झाला आहे. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

संजय जळवी हे मोटरसायकलने कामावरून येत असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पेडणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मदत कार्य केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय जळवी हे गोव्यात पेट्रोल पंपावर कामाला होते. ड्युटी संपवून ते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या मोटरसायकलने घरी येत होते. प्रवासादरम्यान धारगळ सुकेकुळण उड्डाण पूलाच्या जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. यात संजय जळवी हे रस्त्यावर कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 16 =