You are currently viewing २५ वर्षांत राणेंच्या विचारांचे सरपंच असूनही नांदगावचा विकास का झाला नाही?

२५ वर्षांत राणेंच्या विचारांचे सरपंच असूनही नांदगावचा विकास का झाला नाही?

*२५ वर्षांत राणेंच्या विचारांचे सरपंच असूनही नांदगावचा विकास का झाला नाही?*

*आ.वैभव नाईक यांचा आ. नितेश राणेंना सवाल*

नांदगावात मागील 25 वर्षांत सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे राणेंच्या विचाराचे होते. त्यांच्या घरातले होते तरी देखील राणेंनी नांदगावचा विकास का केला नाही? आपल्या स्वार्थासाठी हायवे कॉन्ट्रॅक्टर बरोबर अनेक बैठक घेणारे राणे नांदगाव येथील सर्व्हिस रोड पूर्ण का करून घेऊ शकले नाहीत? स्थानिक आमदार म्हणून नितेश राणेंनी नांदगाव साठी किती निधी दिला? असा रोखठोक सवाल आ.वैभव नाईक यांनी करत नांदगावच्या विकासाची काळजी करू नका. नांदगावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव शिवसेना शाखेसमोर आज शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाची प्रचार सभा संपन्न झाली या प्रचार सभेत आ. वैभव नाईक बोलत होते.
आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, हायकोर्टाच्या निकालावर अवलंबून असणारे सरकार राज्यात आहे.सरकार अस्थिर असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार गेले ६ महिने होऊ शकला नाही. नितेश राणे कधीच मंत्रिमंडळात जाणार नाहीत. मुंबई महानगरपालिका निवडणूक झाल्यावर राज्यातील सरकार कोसळेल.आणि पुन्हा शिवसेनेचे सरकार येणार आहे. त्यामुळे नांदगावच्या विकासाची काळजी करू नका. नांदगावच्या विकासाची जबाबदारी आमची आहे अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली
यावेळी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, कोल्हापूर शिवसेना नेते हाजी अस्लम बादशाहजी, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मज्जीद बटवाले, नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर, रवींद्र तेली, इमाम नावलेकर, प्रफुल्ल तोरसकर, समीर नावलेकर, समीर कुमार, तात्या निकम आदीसह नांदगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा