You are currently viewing महाविकास आघाडीची माजगावात भव्य प्रचारफेरी

महाविकास आघाडीची माजगावात भव्य प्रचारफेरी

माजगावच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडीच्या पेनलला निवडून द्या : शिवसेना विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांचे मतदारांना आवाहन

सावंतवाडी

माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमी महाविकास आघाडीकडून विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचारार्थ माजगावात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजगावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन शिवसेना विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुक १८ डिसेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्ताने माजगावात महाविकास आघाडीतर्फे बाईक रॅली काढण्यात आली होती.

यावेळी चंद्रकांत कासार, आबा सावंत, दिनेश सावंत, मंगेश राठोड, संतोष जोईल, नकुल सावंत, सर्व उमेदवार ग्रामस्थ व माहविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा