You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील आसोली ग्रामपंचायतीच्या पाच बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

वेंगुर्ले तालुक्यातील आसोली ग्रामपंचायतीच्या पाच बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

आसोली ग्रामपंचायत पुर्णपणे भाजपामय ……

आसोली ग्रामपंचायत निवडणुकीत पाच सदस्य हे बिनविरोध निवडून आले होते व सरपंचासहीत चार सदस्य हे भाजपा पुरस्कृत पॅनल मधुन निवडुन आले होते . परंतु बिनविरोध निवडून आलेल्या पाचही ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायत भाजपमय झाली आहे .


भाजपा वेंगुर्ले तालुक्याच्या वतीने साईमंगल कार्यालयात तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता . यावेळी तालुक्यातील १३ सरपंच व १६ उपसरपंचांचा सत्कार जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी व्यासपीठावर अतुल काळसेकर , प्रभाकर सावंत , मनिष दळवी , प्रसंन्ना देसाई , सुहास गवऺडळकर , सुषमा खानोलकर , स्मिता दामले , निलेश सामंत , प्रीतेश राऊळ , सोमनाथ टोमके , वसंत ताऺडेल , साईप्रसाद नाईक , दादा केळुसकर , बाबली वायंगणकर , प्रार्थना हळदणकर , प्रसाद पाटकर उपस्थित होते .
यावेळी तुकाराम शंकर कोंबे , नेत्रा नारायण राणे , शितल विष्णु घाडी , रती मदन नाईक , प्राजक्ता रामचंद्र जाधव या ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी सरपंच बाळा जाधव , उपसरपंच संकेत धुरी , बुथ प्रमुख गुरु घाडी , सोसायटी चेअरमन विश्वनाथ धुरी , ग्रा.पं.सदस्य राखी धुरी , ग्रा ‌पं.सदस्य राकेश धुरी , ग्रा.पं.सदस्य स्वप्निल राजन गावडे , महीला मोर्चाच्या सुजाता देसाई , नंदा गावडे , प्रकाश रेगे , उदय धुरी , विजय बागकर , प्रकाश धुरी , आनंद धुरी , ताता परब , निशा धुरी , मिनल धुरी , देवेंद्र धुरी , राजाराम कीनळेकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 1 =