You are currently viewing सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने २६ मार्च रोजी मोफत आरोग्य शिबीर…

सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने २६ मार्च रोजी मोफत आरोग्य शिबीर…

मालवण

सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने सीमा भगवान ऊर्फ नाना करंजे, सौ. राजश्री नारायण आचरेकर, दीपक बळवंत मयेकर यांच्या स्मरणार्थ सर्व धर्मियांसाठी २६ मार्च रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत भंडारी हायस्कूल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली.

शिबिरात मधुमेह व अंतस्त्राव विज्ञान नलिका रोगतज्ज्ञ डॉ. अमित भोंडवे, दंतरोगतज्ज्ञ डॉ. नीलम भोंडवे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संदीप गव्हाळे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रुतिका गव्हाळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जमदाडे, आयुर्वेद डॉ. अमृता जमदाडे, अंतर्गत औषध चिकित्सक डॉ. कौशिक कुलकर्णी, सामान्य चिकित्सक डॉ. अपूर्वा कुलकर्णी, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अतुल डोंगरे, डॉ. गायत्री गुंड, डॉ. महुवा बिंदल, कान, नाक, घसा रोगतज्ज्ञ डॉ. निनाद ब्रम्हानंदन, डॉ. धनश्री ब्रम्हानंदन, डॉ. रिया मारिया, जठरात्रमार्ग रोगतज्ज्ञ डॉ. चेतन, डॉ. गोविंद, डॉ. प्रभू, डॉ. निखिल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब दिवेकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौ. दिवेकर, रक्त तपासणीस भाटिया, नेत्रचिकित्सक अनिल सुभेदार, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. संजना आदी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत.

शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे २३ मार्चपर्यंत हर्षद नाईक- ९२७१७३७५८६, निलेश गवंडी-७६२०१४५८०५, बाबू परुळेकर- ९४२२५७६४४२, पंकज पेडणेकर- ९४२२३७३०८९, शैलेश मुणगेकर- ७५८८९०६४४४, यशवंत मिठबावकर- ९४२२६३३५८९, सुनील नाईक- ९९२३८३३२१९, भंडारी पतपेढी- ०२३६५-२५३७२९, प्रदीप वेंगुर्लेकर- ९९६००२१९७० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी भाई गोवेकर, प्रमोद करलकर, मिलिंद झाड, अजय मुणगेकर, राजन पांजरी, सचिन गवंडे, रमण वाईरकर, अजित गवंडे, आनंद तोंडवळकर, प्रदीप वेंगुर्लेकर, अरुण दुधवडकर, प्रकाश करंगुटकर, मोहन वराडकर, पंकज पेडणेकर, जयप्रकाश परुळेकर, शैलेश मुणगेकर, चंदन पांगे, भाऊ साळगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा