You are currently viewing अवलोकन

अवलोकन

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अवलोकन*

 

निसर्ग नुसता बघू नका

अवलोकन करा.

कसा सूर्य उगवतो

कसा वाहतो झरा.

 

 

कुठून येतात ढग

कसे आणतात पाणी.

कसे उडतात पक्षी

कशी गातात गाणी.

 

 

डोंगर आले कुठून

दऱ्या झाल्या कशा.

रात्र होते कशी.

कशी येते उषा.

 

 

झाडांवरती पक्षी

घरटी बांधतात कशी.

फुलातून मध कसा

आणते मधमाशी.

 

आभार सागर बघा

बघा दिशा दाही.

निसर्गाकडून शिकण्यासारखं

आहे खूप काही !

 

कवयित्री

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा