You are currently viewing पोस्टातर्फे आधार कार्ड ला मोबाईल नंबर अपडेट करण्याची मोहिम

पोस्टातर्फे आधार कार्ड ला मोबाईल नंबर अपडेट करण्याची मोहिम

सिंधुदुर्ग :

इंडिया पोस्ट पेमेंट बँक द्वारे 30 व 31 ऑगस्ट रोजी आधार कार्ड ला मोबाईल नंबर अपडेट करण्याची विशेष मोहीम सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आधार कार्ड ला मोबाईल अपडेट करण्याचे अनेक फायदे पुढीलप्रमाणे आहेत. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल अपडेट असणे गरजेचे आहे. सरकारकडून दिले जाणारे सर्व प्रकारचे अनुदान जमा होण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल अपडेट असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप चे फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल अपडेट असणे गरजेचे आहे. नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल अपडेट गरजेचे आहे. आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल अपडेट असणे गरजेचे आहे.

आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये आधार कार्ड ला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अधीक्षक सिंधुदुर्गनगरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा