You are currently viewing १० मे रोजी आरोंदा सातेरी भद्रकाली देवीचा वर्धापन दिन सोहळा

१० मे रोजी आरोंदा सातेरी भद्रकाली देवीचा वर्धापन दिन सोहळा

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरी भद्रकाली देवीच्या २५ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिम्मित शुक्रवारी १० मे रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १० मे रोजी मंदिरात सकाळी ७ वाजता धार्मिक कार्यक्रम, कुंकूमार्चन, दुपारी १२ वाजता बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, सार्वजनिक प्रार्थना, महानैवेद्य, आरती, सायंकाळी ५ वाजता ह. भ. प. शारदा नाईक आरोंदेकर (गोवा) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. रात्री १० वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘नर्मदा मागे का फिरली’ हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहेत. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती तसेच देवस्थान मानकरी आणि आरोंदा ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा