कामगार अधिकारी कार्यालयात एजंटगिरी बोकाळली…

कामगार अधिकारी कार्यालयात एजंटगिरी बोकाळली…

एजंट व काही आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे होतेय कामगारांची आर्थिक पिळवणूक..

….अन्यथा मनसे करेल तीव्र आंदोलन…संतोष भैरवकर

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत असंघटित कामगारांसाठी विविध मंडळाच्या माध्यमातून असंख्य कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत सदर योजनांच्या माध्यमातून कामगारांचे जीवनमान उंचावणे व त्यांना ही प्रमुख उद्दिष्टे आहेत मात्र अलीकडील काळात सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात एजंटगिरी बोकाळल्या चे परिस्थिती निर्माण झालेली आहे जिल्ह्यातील काही विशिष्ट एजंट व ताई आउटसोर्सिंग कर्मचारी यांच्या अभद्र युतीतून गोरगरीब कष्टकरी कामगारांची आर्थिक पिळवणूक होत असून तो प्रचंड भरडला जात असल्याच्या असंख्य तक्रारी मनसेकडे प्राप्त आहेत. जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग यांनी यासंदर्भात वेळीच दखल घेऊन उचित कार्यवाही करावी अन्यथा मनसे येत्या काळात यासंबंधी आक्रमक पवित्रा घेणार असून तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसे परिवहन कामगार संघटना जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा