You are currently viewing भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा भाजपा – वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा भाजपा – वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

वेंगुर्ला :

 

नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी प्रथमच वेंगुर्ले तालुका कार्यालयात भेट दिली असता, तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी त्यांना नुतन कारकिर्दीस शुभेच्छा देऊन, तालुक्यांमध्ये युवकांची फळी निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, हेमंत गावडे, समीर नाईक, संतोष पुजारे, समर्थ कोरगांवकर, गौरेश वायंगणकर, मारुती दोडशानट्टी, कौस्तुभ वायंगणकर, गौरव खानोलकर इत्यादी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा