You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायानी घेतली उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायानी घेतली उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट

वारकरी संप्रदायाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा केला सत्कार

*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळाने पडवे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत केंद्रात लघु व मध्यम उद्योग मंत्री झाल्याबद्दल सत्कार केला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायासाठी पंढरपूर येथे वारकरी भवन व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली .
याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी भवन लवकरात लवकर व्हावे यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्‍वासन उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय अध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर. सिंधुदुर्ग जिल्हा युवा वारकरी संघटना अध्यक्ष पंढरीनाथ सावंत ,कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, विनोद पाटील महाराज, दत्‍ताराम सावंत, चंद्रकांत परब, प्रकाश सावंत, राजेश पाताडे ,सत्यवान परब, भास्कर चाळके, एस के सावंत ,सुहास परब, भालचंद्र बागवे प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा