You are currently viewing शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या मध्यस्थीने ग्रा.पं. संघटनेचे आंदोलन स्थगित…

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या मध्यस्थीने ग्रा.पं. संघटनेचे आंदोलन स्थगित…

ग्रा.प. कर्मचार्‍यांचे उपोषण मागे !

​​सिंधुदुर्ग : ​
शासानाने ग्रा.पं.कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदमध्ये सरळ सेवेने १०/% आरक्षण लागू केलेले आहेत​. ​ त्यानूसार ज्या ग्रा.पं.कर्मचार्‍यांची कार्यालयात दहा वर्षाहून कमी नसेल इतकी सलग पूर्ण वेळ सेवा असेल असा ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा सेवेतील वर्ग -​३ व ​४ च्या कोणत्याही पदावर ​नियुक्तीसाठी पात्र असेल अशी ​नियुक्ती ग्रा.प.कर्मचार्‍यांच्या सेवा जेष्ठतेच्या आधारे संबधित जिल्हा परिषदच्या मुख्ख कार्यकारी अधिकार्‍यांकङून करण्यात येई​ल, ​​असे शासनाचे निर्देश असताना जिल्हा परिषदेच्या संबधीत विभागाकङून नेमणूका दिल्या नाहीत​, ​ यासाठी गेली २ वर्षे वारंवार पाठपुरावा करुन सुध्दा ​नियुक्ती मिळाली नाही.​ ​या अन्यायासाठी व इतर सेवा शर्तीसाठी जिल्हा परिषद समोर ओरस ये​थे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा​ ​​विद्यमान सदस्य संजय पङतेनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.​ ​ ​आश्वासनाअंती उपोषण मागे घेण्यात आले. ​ ​

तसेच जिल्हा परिषद मुख्ख कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी ग्रा.प.कर्मचार्‍यांवर झालेल्या अन्यायाबाबत उपोषण स्थळी भेट दिली​. ​ मागण्या जाणून घेतल्या​. ​ यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते​. ​ ग्रा.प.कर्मचार्‍याची गेली २ वर्षे भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यासाठी शासनाकङे मागणी करण्यात येईल​. ​ तसेच जिल्हा परिषद सेवेत १०% पदभरतीत गेली २ वर्षे टाळाटाळा केली असेल याबाबत तपासणी करण्यात येईल तसेच यापुढे जिल्हा परिषद भरती प्रकिया राबविताना संघटनेसोबत सभा घेण्यात येईल, व ग्रा.प.कर्मचार्‍यांच्या सेवा बिषयक बाबींबाबत अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्ख कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी दिले.

​ ​यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमूख संजय पङते उपस्थित होते​. ​ तसेच संघटना जिल्हाध्यक्ष​ ​हरिश्चंद्र आसयेकर,​ ​सावंतवाङी तालुकाध्यक्ष​ ​गुरुनाथ घाङी​, जिल्हा सचिव​, ​सुहास बांबार्ङेकर​,​ सदस्य हनूमान केदार, गोविंद आसोलकर, ​अशोक जाधव,​ ​दत्तप्रसाद परब,​ ​राजन नाईक,​ ​सूहास साटेलकर,​ ​शांताराम जाधव​, ​न्हानू घाटकर,​ ​उत्तम अमरे, शिवराम धुरी​, ​संकेत कवठणकर,​ ​राजन राऊळ​, ​श्रीम.सोनाली साळगांवकर सहीत बरेच कर्मचारी उपस्थित होते​. ​ ​​आश्वासना अंती उपोषण मागे घेण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + seventeen =