You are currently viewing सावंतवाडी तहसीलदारपदी अरुण विलास उंडे यांची नियुक्ती

सावंतवाडी तहसीलदारपदी अरुण विलास उंडे यांची नियुक्ती

सावंतवाडी :

सावंतवाडी तहसीलदारपदी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी अरुण विलास उंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांसाठी ते प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून कार्यभार पाहणार आहेत. आज सावंतवाडी तहसीलदार पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला आहे. उंडे हे मूळ उस्मानाबाद येथील आहेत. तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्यानंतर सावंतवाडीत प्रभारी तहसीलदार म्हणून श्रीधर पाटील यांनी गेले सात महिने काम पाहिले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा