You are currently viewing ‘उत्कृष्ट संस्था चालक’ पुरस्काराने एडगाव गावचे सुपुत्र सदानंद रावराणे यांचा सन्मान…

‘उत्कृष्ट संस्था चालक’ पुरस्काराने एडगाव गावचे सुपुत्र सदानंद रावराणे यांचा सन्मान…

मुंबईचे सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सन्मानित

वैभववाडी

शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून देण्यात येणारा २०२१ चा पुरस्कार वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र व मिलिंद विद्यालय वईचे संस्थापक तसेच वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद दत्ताराम रावराणे यांना ‘उत्कृष्ट संस्था चालक’ म्हणून मुंबईचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.

सन २०२१ या वर्षातील विविध पुरस्कारांचा सोहळा रविंद्र नाट्य मंदिर मुंबई येथे पार पडला. वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र व मिलिंद विद्यालय पवईचे संस्थापक तथा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे यांना ‘उत्कृष्ट संस्था चालक’ म्हणून मुंबईचे सह. आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.

सदानंद रावराणे यांचे बंधू जयेंद्र दत्ताराम रावराणे यांचे देखील आपल्या राजकीय कारकीर्दी बरोबरच वैभववाडी तालुक्यातील किंबहूना जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. हे सर्वश्रृत आहे. श्री. रावराणे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल रावराणे कुटुंबियांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-पालक तसेच सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. या सोहळ्यास माननीय शिक्षक आमदार कपिल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते._

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =