You are currently viewing जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. शामाप्रसाद मुखर्जीं स्मृतिदिनानिमीत्त भाजपा महीला मोर्चा, वेंगुर्लेच्या वतीने वृक्षारोपण

जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. शामाप्रसाद मुखर्जीं स्मृतिदिनानिमीत्त भाजपा महीला मोर्चा, वेंगुर्लेच्या वतीने वृक्षारोपण

वेंगुर्ला :

 

भाजपा महीला मोर्चा वेंगुर्ले च्या वतीने डाॅ. शामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतिदिना निमीत्त मांडवी खाडी नजीक वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा व नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार सौ.उमाताई खापरे यांच्या सुचनेनुसार संपुर्ण महाराष्ट्रात डाॅ. शामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतिदिना निमीत्त विवीध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केल्याचे महिला मोर्चाच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्षा सौ. स्मिता दामले यांनी सांगितले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, महिला मोर्चाच्या ता.सरचिटणीस वृंदा गवडंळकर, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार, आकांशा परब, रसीका मठकर, वृंदा मोर्डेकर, अंकिता देसाई इत्यादी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा