You are currently viewing भाजपा लोकसभा प्रवास योजना संयोजकपदी अतुल काळसेकर

भाजपा लोकसभा प्रवास योजना संयोजकपदी अतुल काळसेकर

भारतीय जनता पार्टीचे विद्यमान प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांची लोकसभा प्रवास योजनेच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

भाजपा पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकसभेच्या काही मतदारसंघात संघटन बांधणी जोमाने सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे.

येत्या 18 महिन्याच्या कालावधीत संबंधित लोकसभा मतदारसंघ आणि त्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ जिकण्याची तयारी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतुल काळसेकर हे संयोजक म्हणून कामाचे नियोजन करतील तर आमदार आशिष शेलार हे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा