You are currently viewing सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान कणकवलीच्या आयोजित रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान कणकवलीच्या आयोजित रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान

कणकवली :

सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान कणकवली तालुका आणि आम्ही कणकवलीकर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५१ दात्यांनी रक्तदानाचे महत्त्व जाणून रक्तदान केले. कणकवली नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक नाडकर्णी यांनी प्रास्ताविक केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रक्तदानाचे महत्त्व विषद करताना डॉ. विद्याधर तायशेटे यांनी “रक्तदान धर्म” हा स्वभाव बनला पाहिजे. कारण रक्तदान केल्याने कमजोरी येत नाही, उलट आठवडाभरातच आपण दान केलेल्या रक्ताची भरपाई निसर्गाकडून होत असते. रक्तदान करताना आपण मानवतेच्या हिताचे कार्य करीत आहोत हे कायम लक्षात ठेवा. तुमचे रक्तदान दुसऱ्या कोणाचेतरी जीवन समृद्ध करत असते. तरूण वर्गाने वर्षातून दोन वेळा रक्तदान करून मानवतेला प्रोत्साहन करणे आज गरज बनली आहे, असे प्रतिपादन केले. या रक्तदान शिबिरासाठी एच्.डी.एफ्.सी. बँकेचे सहप्रायोजकत्व लाभले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान कणकवलीचे अभिषेक नाडकर्णी, रुजाय फर्नांडिस, अमोल भोगले, सिद्धी वरवडेकर, सुहासिनी कुलकर्णी, योगेश जाधव, सचिन जाधव, यांच्यासह एच्.डी.एफ्.सी. बँकेचे मंगेश जाधव, सिद्धेश लाखण, धनश्री बांदेकर, समृद्धी सावंत, हर्षाली चव्हाण, जितेंद्र ईलकर, संदीप गजोबार, प्रथमेश दळवी यांनी फार श्रम घेतले.

आम्ही कणकवलीकरांच्या वतीने डॉ.विद्याधर तायशेटे, संजय मालंडकर, रूपेश खाड्ये, अशोक करंबेळकर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा देत आयोजकांचे कौतुक केले. सिंधुनगरी येथून सिव्हिल हॉस्पिटल मधील वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती महाले, अधिपरिचारीका प्रांजली परब, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मयुरी शिंदे, परिचर नंदकुमार आडकर, वाहनचालक नितीन गावकर, मदतनीस सुरेश डोंगरे यांनी सेवा दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =