You are currently viewing पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारीला….

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारीला….

सिंधुदुर्गनगरी

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती वभटक्या जमाती विद्ययानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता ५ वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक १२ फेब्रुवारीला घेण्यात येणार असल्याची, माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी दिली आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता 8 वी मध्ये प्रेवश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा