You are currently viewing पत्रकार अमीत खोत यांचा मालवण महोत्सव निमित्ताने आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

पत्रकार अमीत खोत यांचा मालवण महोत्सव निमित्ताने आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

मालवण

कोरोना काळात मालवण पालिकेच्या कोरोना नियंत्रण समितीवर सदस्य म्हणून कार्यरत असणारे व दोन वर्षे सेवाभावी वृत्तीने काम करणारे पत्रकार अमित खोत यांचा मालवण नगरपालिकेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. मालवण पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने दांडी येथील सोहळ्यात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते अमित खोत यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तहसीलदार अजय पाटणे, सिने अभिनेते दिगंबर नाईक, विजय पाटकर, संदेश पारकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर, जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, नितीन वाळके, मंदार केणी, बाबी जोगी, यतीन खोत, पंकज सादये, मंदार ओरसकर, सारस्वत बँक मॅनेजर शीतल सामंत, वृत्त निवेदक ऋषी देसाई, किसन मांजरेजर, भाऊ मोरजे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अमित खोत यांनी कोरोना काळात नगरपालिका, पोलीस, तहसील प्रशासन, पंचायत समिती यांच्या सोबत सातत्याने काम केले. या त्यांच्या अखंडित सेवाकार्याचा सन्मान महोत्सव उदघाटन सोहळ्या निमित्ताने करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा