You are currently viewing घोटगे भटवाडी येथील भाजपचे आत्माराम गुरव, माजी ग्रा.प.सदस्या समाधानी गुरव शिवसेनेत

घोटगे भटवाडी येथील भाजपचे आत्माराम गुरव, माजी ग्रा.प.सदस्या समाधानी गुरव शिवसेनेत

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते बांधले शिवबंधन

दोडामार्ग

घोटगे भटवाडी येथील भाजप कार्यकर्ते आत्माराम उर्फ बाबी गुरव, माजी ग्रा.प.सदस्या समाधानी गुरव यांच्यासह भटवाडी व खालची गुरववाडीतील अनेक भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवबंधन बांधून, पक्षाच्या शाली घालून आ. वैभव नाईक यांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी भटवाडी येथील विठ्ठल गुरव, वैष्णवी गुरव, निधी गुरव, उमेश परब, उर्मिला परब, प्रमोद लाड, प्राजक्ता लाड, गजानन पवार, शारदा पवार, भाऊ केळुसकर, आनंदी केळुसकर,अनिता पावसकर, विलास पावसकर, सुरेश रायकर, बाळा रायकर, विनय हनपडे,सत्यवान रायकर, शारदा पवार, भाऊ घाडीगावकर, खालची गुरववाडीतील सुभाष गुरव, शिवा गुरव, सचिन गुरव आदी उपस्थित होते.
यावेळी घोटगे उपसरपंच गीतेश सावंत,घोटगे शाखा प्रमुख चंदन ढवळ, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे,अविनाश नाईक,सोनवडे शाखा प्रमुख गुरु मेस्त्री, सुधीर नाईक,भावेश परब,निलेश परब,काशीराम घाडी,गणेश शिंदे, रमेश रेडकर, हर्षद ढवळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + twelve =