You are currently viewing बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

*पुरुषांच्या पौरुषत्वाला वात्सल्याची खंबीर साथ असल्याशिवाय देश प्रगती करू शकणार नाही – प्रा. अरुण मर्गज*

 

कुडाळ :

“पुरुषांच्या पौरुषत्वाला स्त्रीच्या वात्सल्याची खंबीर साथ असल्याशिवाय समाज व देश प्रगती करू शकणार नाही. हे ओळखून महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने स्त्री शिक्षणाची चळवळ उभारली. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या मूळ उद्देशाचा आपण विसर पडून देऊन नये”. असे उद्गार बॅरिस्टर नाथ महिला आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “स्त्री शिकल्याशिवाय समाज सुधारणार नाही “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगताते उध्दरी”. अशी स्त्री जोपर्यंत सक्षम, सबल, ज्ञानी होत नाही. तोपर्यंत ती आपल्या प्रत्येक अपत्याच्या रूपाने समाज घडवू शकणार नाही. ही गरज ओळखून महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुलेंच्या मदतीने स्त्री शिक्षणाची चळवळ उभारली आणि त्या चळवळीमुळेच आज स्त्री प्रचंड वेगाने शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करत आहे. त्या सावित्रीबाई फुले यांचे ऋण फेडण्यासाठी आपण सक्षम झालं पाहिजे व एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला हात देऊन आपल्या प्रगतीमध्ये तिला सहभागी करण्याची आजच्या काळात गरज आहे. असे सांगत स्त्रियांच्या कलागुणांचा गौरव केला व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले

यावेळी व्यासपीठावर बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, प्रा नितीन बांबर्डेकर, प्रा.योगिता शिरसाट, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या उपप्राचार्य विभा वझे, महिला व रात्र महाविद्यालयाच्या प्रा.प्रांजना पारकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रा. वैशाली ओटवणेकर, ज्युनिअर कॉलेजचे मंदार जोशी व विविध विभागांचे विद्यार्थी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरू झालेल्या या कार्यक्रमांमध्ये प्रा. परेश धावडे यांनी आपले विचार व्यक्त करताना “भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याची शक्ती स्त्रीमध्ये आहे आणि या आदिशक्तीच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे ऋण आजच्या समाजाने मान्य केले पाहिजे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सबल सज्ञान व स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहीले पाहिजे. आधुनिकतेची ची कास धरताना सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणारे सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात केले पाहिजे.” असे सांगत त्यांनी स्त्रीच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेऊन गौरव केला व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलेे. यावेळी विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे ‌प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा नितीन बांबर्डेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − seven =