You are currently viewing माळशेज घाटात पर्यटकांच्या गाडीवर कोसळली दरड

माळशेज घाटात पर्यटकांच्या गाडीवर कोसळली दरड

माळशेज घाटात पर्यटकांच्या गाडीवर दरड कोसळली आहे. सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान घाटमाथ्यावरील बोगद्याजवळ ही घटना  घडली. काही पर्यटक गाडी थांबवून बाजूला निसर्ग भ्रमंती करण्यास गेले असताना घटना घडली.

सुदैवाने गाडी रिकामी असल्याने कुणालाही इजा झाली नाही, मात्र गाडीचं नुकसान झालं आहे. दरडीमुळे वाहतुकीवर मात्र कुठलाही परिणाम नाही. पण गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

नगरकडे जाणारे काही पर्यटक गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवून निसर्ग भ्रमंती करण्यास गेले असताना बाजूच्या डोंगराहुन अचानक दरड खाली येऊन गाडीवर कोसळली. गाडीवर पडलेली दरड पाहून किती मोठा अपघात घडला असता याचा अंदाज येतो.

दोन दिवसा पूर्वी जिल्हाधीकाऱ्यांनी एक आदेश काढून माळशेज घाट हा पुढील सूचना मिळेपर्यत पर्यटकांना साठी बंद केला आहे. मात्र तरीही अनेक पर्यटक घाटात गाडी थांबून निसर्गाचा आनंद घेत असतात. हे अत्यंत धोकादायक आहे. प्रत्येक पावसाळयात माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडातात. त्यामुळे पर्यटकांनी पावसाळ्यात घाटात थांबू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 5 =