निरवडे-कोनापाल येथे रविवारी रक्तदान शिबिर

निरवडे-कोनापाल येथे रविवारी रक्तदान शिबिर

  सावंतवाडी

शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळ कोनापाल आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण प्राथमिक शाळा निरवडे कोनापाल नं. २, भाईड येथे सकाळी ८:०० ते दुपारी १२:३० वेळेत रविवारी 28 मार्च ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी रक्तदान करण्यासाठी इच्छूक रक्तदात्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा व शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळ कोनापाल व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदूर्ग सावंतवाडी कार्यकारिणी यांनी केले आहे.

संपर्कासाठी क्रमांक :

श्री. आबा नाईक – ९२८४३२६६५२
श्री. संदीप बाईत – ९२८४८४५९०६

रक्त दान करणाऱ्यांना श्री शैलेश सावंत (विराज नर्सरीचे मालक) यांच्याकडून सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
श्री.अवधूत गावडे (एक्स बी यंग चे मालक ) यांच्याकडून सर्व रक्तदात्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली आहे.

रक्तदात्यांसाठी सूचना व माहिती

१)वयोगट- १८ वर्षे ते ५५ वर्षे
२)वजन- ५० किग्रॅ पेक्षा जास्त असावे.
३) रक्तदान करण्याच्या आदल्या दिवशी पूर्ण झोप झालेली असावी. (जागरण नसावे)
४) कोणत्याही प्रकारची औषधे घेतलेली नसावीत.(अॅस्प्रिन,पॅरासिटॅमल व इतर)
५)रक्तदान करण्याच्या आदल्या दिवशी जेवण करून विश्रांती घ्यावी व सकाळी येताना भरपेट नाष्टा करुन यावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा