You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पुन्हा २२ दिव्यांग बांधवांना स्कुटरचे वाटप

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पुन्हा २२ दिव्यांग बांधवांना स्कुटरचे वाटप

पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वाटप

सलग ३ वर्षे आ. वैभव नाईक यांचा सातत्यपूर्ण उपक्रम

आजकाल दुचाकी खरेदी करणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरचेच असतानाच कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना चारचाकी स्कुटरची भेट दिली. कुडाळ क्रीडा संकुल येथील शिमगोत्सव कार्यक्रमामध्ये आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघातील तब्बल २२ दिव्यांग बांधवांना चारचाकी स्कुटरचे वाटप पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यामुळे दिव्यांग बांधवांही आनंदित झाले होते. त्यांनी आम.वैभव नाईक यांचे आभार मानले.


समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने आणि समाजातील दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांना काहीना काही मदत करण्याच्या हेतूने तसेच दिव्यांग बांधवांना स्वावलंबी करण्यासाठी आ. वैभव नाईक स्कुटर वाटपाचा उपक्रम राबवितात. गेली सलग ३ वर्षे त्यांनी सातत्याने हा उपक्रम राबविला आहे.
यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर,आमदार वैभव नाईक, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत संदेश पारकर,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे , जि. प. माजी गटनेते नागेंद्र परब, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, अमरसेन सावंत, हरी खोबरेकर, कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजन नाईक, बबन बोभाटे, संतोष शिरसाट, अतुल बंगे, जयभारत पालव, संजय आंग्रे, आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, राजू कविटकर,वर्षा कुडाळकर, श्रेया परब, स्नेहा दळवी,मथुरा राऊळ विकास कुडाळकर, संजय भोगटे, कृष्णा धुरी,शेखर गावडे, सचिन कदम, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, दीपक आंगणे, सचिन काळप,सुशील चिंदरकर, रुपेश पावसकर, उदय मांजरेकर, किरण शिंदे, राजू गवंडे, श्रेया गवंडे,ज्योती जळवी,सई काळप, श्रुती वर्दम ,रामा धुरी,योगेश धुरी,मंदार गावडे, अमित भोगले,संदीप म्हाडेश्वर,दिनेश वारंग,चेतन पडते,राजेश म्हाडेश्वर,भूषण परूळेकर,कृष्णा तेली,पंकज वर्दम, मंजुनाथ फडके,कार्यालय प्रमुख गोट्या चव्हाण, स्वीय सहाय्यक बाबी गुरव,नितीन राऊळ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 16 =