You are currently viewing २ जूनला वेंगुर्ल्यात ग्रामीण पर्यटन विकास समुपदेशन

२ जूनला वेंगुर्ल्यात ग्रामीण पर्यटन विकास समुपदेशन

वेंगुर्ले :

 

कोकण ट्रॅव्हल क्लब आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ले स्पर्धा परीक्षा व नोकरी मार्गदर्शन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण पर्यटन विकास समुपदेशन कार्यक्रम २ जून रोजी सकाळी १०ते १२ वाजता बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ले येथे आयोजित केले आहे या सेमिनार मध्ये कोकणात पर्यटन व्यवसायात असलेल्या संधी आणि कोकण ट्रॅव्हल क्लब व्दारे सहा महिन्याचे ग्रामीण पर्यटन विकास प्रशिक्षणा बद्दल माहिती दिली जाणार आहे. या सेमिनारला कोकण ट्रॅव्हल क्लब प्रतीक गावडे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉक्टर धनश्री सागर पाटील, गावठी बाजार शेतीचे संदीप राणे, प्रा नंदगिरी कर हे मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी कोकण ट्रॅव्हल क्लब च्या ८६६९८१०४८५या क्रमांकावर किंवा व्हाट्सअप लिंक https://bit.ly/3ys2gS7 येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा