You are currently viewing प्रजासत्ताक दिनी वीज ग्राहक संघटना करणार महावितरणच्याविरोधात उपोषण…

प्रजासत्ताक दिनी वीज ग्राहक संघटना करणार महावितरणच्याविरोधात उपोषण…

प्रजासत्ताक दिनी वीज ग्राहक संघटना करणार महावितरणच्याविरोधात उपोषण…

जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत निर्णय…

कुडाळ

जिल्हा वीज ग्राहक संघटनेची बैठक कुडाळ विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली तसेच संघटनेची पुढील कामकाजाची महत्त्वपूर्ण दिशा ठरविण्यात आली. सदर बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संजय गावडे, कुडाळ तालुका अध्यक्ष गोविंद सावंत तसेच जिल्हा तथा तालुका संघटना पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे सचिव निखिल नाईक यांनी संघटना स्थापन झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत संघटनेने अल्पावधीत केलेल्या कामगिरीची सर्वांना सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने गेल्यावर्षी ३१ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी महासंघ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील वीज वितरणबाबत असलेल्या विविध समस्या आणि हे प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ ठरलेल्या महावितरण विरोधात संघटनात्मक कामाची आवश्यकता लक्षात घेता जिल्ह्यातील वीज ग्राहकांना एकत्रित आणण्यासाठी संघटनेची निर्मिती करण्यात आलेली होती. अल्पावधीतच संघटनेने अनेक प्रश्न मार्गी लावून वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. एक वर्षातच संघटना जिल्ह्यातील सर्व गावागावांमध्ये पोहोचली आहे आदी माहिती दिली.

प्रमुख मागण्या अजूनही प्रलंबित, पर्यायी संघटना करणार प्रजासत्ताक दिनी उपोषण
संघटनेने वेळोवेळी केलेल्या मागण्यांपैकी काही प्रमुख मागण्या अजूनही प्रलंबित असल्याने बैठकीत महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच महावितरणकडून आश्वासने मिळून सुद्धा अजूनही काही कामे पूर्णत्वास गेली नसल्याने मुजोरगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. त्याचप्रमाणे आजपर्यंत अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त जागा न भरल्याने जिल्हाभर वीज वितरणामध्ये अनियमितता आढळून येत आहे. वीज बिले भरूनही ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. महावितरण अधिकारी वर्गाकडून होणारी वीज वितरणमधील दिरंगाई, मुजोरगीरी, व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी वीज ग्राहक संघटनेने प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा मार्ग अवलंबणे योग्य असल्याचे मत जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी मांडले असता उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी याला सहमती दर्शविली.

प्रतिक्रिया व्यक्त करा