शिरशिंगे-गोठवेवाडी येथे डोंगराचा काही भाग खचला…

शिरशिंगे-गोठवेवाडी येथे डोंगराचा काही भाग खचला…

भातशेतीत माती घुसली, सुदैवाने कोणतीही नुकसानी नाही…

सावंतवाडी

तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरशिंगे-गोठवेवाडी येथील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भातशेतीत माती घुसली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही. याबाबत ग्रामस्थांकडुन माहीती देण्यात आली आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दुजोरा दिला असून, तो भाग वस्तीपासून दूर आहे. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही. झालेली शेतीची नुकसानी देण्यासाठी शासनाकडुन निश्चितच प्रयत्न करण्यात येतील,असे त्यांनी सांगितले. तालुक्यात पहाटे पासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. ठिक-ठिकाणी पाणी भरले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळण्याचा प्रकार घडला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा