You are currently viewing आरोंदा पंचक्रोशी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने माजी सैनिकांचा सत्कार..

आरोंदा पंचक्रोशी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने माजी सैनिकांचा सत्कार..

सावंतवाडी :

 

आरोंदा पंचक्रोशी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आरोंदा पंचक्रोशी परिसरातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. आरोंदा पंचक्रोशी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना संस्थेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात साजरे करत असताना संस्थेचाही यामध्ये सहभाग असावा, या उद्देशाने संचालक मंडळाने आरोंदा पंचक्रोशीतील माजी सैनिकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या सीमेवर अविरतपणे जागता पहारा देत देशाची सेवा करतानाच आपले संरक्षण करण्याऱ्या सैनिकांप्रती आदरभाव व ऋण व्यक्त करणे सर्वांचेच कर्तव्य बनते. त्यादृष्टीने माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ व सुपारीचे रोप प्रदान करून सन्मान करण्यात आला. यामध्ये माजी सैनिक रामदास कांबळी, बाबुराव नाईबागकर, शांताराम जाधव, विश्राम बा. नाईक, अनंत य. नाईक, प्रशांत नाईक, अरुण परब यांचा समावेश आहे. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन महादेव बुडे, व्हा. चेअरमन ज्योती पेंडसे, संचालक दिगंबर सौदागर, राधाकृष्ण गडेकर, उत्तम नाईक, मंगेश पराडकर, रावजी गावडे, पंकज तळवणेकर, व्यवस्थापक हनुमंत कुबल, लिपिक ममता मातोंडकर, सभासद विद्याधर नाईक आदी उपस्थित होते.

तसेच आरोंदा प्राथमिक शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांना सुपारीचे रोप प्रदान केले. यावेळी निवृत्त शिक्षक बाळा आरोंदेकर, शिवाजी जाधव, आदींसह शाळेतील शिक्षक व पालक उपस्थित होते. विशेष उपक्रमाअंतर्गत आरोंदा पंचक्रोशीतील गरीब कुटुंबातील ३ अपंग व्यक्तींना त्यांचा घरी जाऊन अल्पशी आर्थिक मदत प्रदान केली. यामध्ये अर्जुन रेडकर, महेश नाईक, पुंडलीक घोगळे यांचा समावेश आहे. त्याच बरोबर या संस्थेचे स्थापनेपासून जडणघडणीत यापूर्वी आपले नि:स्वार्थीपणे योगदान दिलेल्या माजी संचालकांचा शाल व श्रीफळ, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eight =