You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील गौण खनिज, बोअर ब्लास्टींग बंद करा; जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना निवेदन..

सावंतवाडी तालुक्यातील गौण खनिज, बोअर ब्लास्टींग बंद करा; जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना निवेदन..

सावंतवाडी तालुक्यातील गौण खनिज, बोअर ब्लास्टींग बंद करा; जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना निवेदन..

सिंधुदुर्गनगरी

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, वेत्ये, निगुडे ,सोनुर्ली, येथील गौण खनिज उत्खनन,व बोअर ब्लास्टिंग कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. अशी मागणी इन्सुली येथील अजय कोठावळे, सुबोध परब, शरद कोठावळे, नंदकिशोर कोठावळे आदी ग्रामस्थांनी जिल्हा खनी कर्म अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, वेत्ये, निगुडे, सोनुर्ली, येथे २४ तास गौण खनिज उत्खनन सुरू आहे. तेथे बोर ब्लास्टिंग करण्यात येत आहे. हे तात्काळ बंद व्हावे. यासाठी २६ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते.

यावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अद्यापही ठोस अशी कारवाई झालेली नाही. सदरचे उत्खनन व ब्लास्टिंग राजरोज अद्यापही सुरू आहे. सदरचे गौण खनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीच्या नावे बोर ब्लास्टिंगचा परवाना पडताळणी वेळी दिसून आलेला नाही. किंवा त्याचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आलेले नाही. सदरची कंपनी पूर्वीच बंद झालेले आहे. याच जागेवर अन्य कंपनी कडून गौण खनिज उत्खनन व क्रशर सुरू असून संबंधित कंपनीकडे बोर ब्लास्टिंगचा परवाना नसतानाही सर्व नियम व कायदेशीर तरतुदी धाब्यावर बसउन राजरोसपणे बोर ब्लास्टिंग चे काम सुरू आहे. याबाबत येत्या १५ दिवसात तात्काळ कार्यवाही करून येथील बोर ब्लास्टिंग कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. तसेच यापुढे सदर गावात नव्याने क्रशर उत्खनन परवानगी देण्यात येऊ नये. तसेच ज्यांचे परवाने संपले आहेत त्यांना नूतनीकरण करून देऊ नये. त्यास आमची कायदेशीर हरकत आहे. येत्या पंधरा दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आम्हाला नाईलाजस्तव आपल्या खनीकर्म कार्यालयासमोर आत्मदहन करावे लागेल. असा इशारा आज दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी अजय कोठावळे, सुबोध परब, शरद कोठावळे, नंदकिशोर कोठावळे, महेश धुरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − nineteen =