You are currently viewing जीवनप्रवास

जीवनप्रवास

*काव्य निनाद साहित्य मंचच्या ज्येष्ठ सदस्या लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखीत अप्रतिम काव्यांजली काव्यरचना*

*जीवनप्रवास*

प्रवास आपल्या
सहजीवनाचा
तुझ्यामाझ्यातील
अतूट प्रेमाचा ******1

शपथ दिलीस
साथ राहण्याची
प्रीती करण्याची
नातं जपण्याची ****2

सोबत प्रवास
सात पावलांचा
करून दाखवू
निर्धार मनाचा ****3

दीर्घ आयुष्याची
जोडी तुझी माझी
नेहमीच साथ
प्रवासात तुझी ***** ४

जीवनाची नौका
निघाली प्रवासा
वाटे अवघड
नियतीचा फासा ******६

दान नियतीचे
झाली ताटातुट
संपला प्रवास
झाली फाटाफूट ******७

प्रतिभा पिटके, अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − five =