You are currently viewing मेघश्याम

मेघश्याम

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक,कवी प्रा.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना

निळ्या ढगांनी मांडव घातला
देतो निरोप काळ्या मातीला

अनादी अनंत निसर्ग देवता
मेघश्याम रात्री बरसता
गडगडाटाने उमाळा फुटला
देतो निरोप काळ्या मातीला

थेंब थेंब ते टप्पोर पडती
कणा कणात हळु बिलगती
वास आला तो सौंदमीनीला
देतो निरोप काळ्या मातीला

डोंगर दर्या गिरीकंदराला
फुटला पान्हा धबधब्याला
पुर चढला नदी सरोवराला
देतो निरोप काळ्या मातीला

मेघांच्या पालखीत बसुनी
मधुसुदन आले कुंज वनी
निरोप दिला वेणु मधुनी
गोकुळीच्या त्या यमुनेला
देतो निरोप त्या बावरीला

प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी
अंकली बेळगांव
कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा