You are currently viewing नववर्ष सुखाचे जावो

नववर्ष सुखाचे जावो

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नववर्ष सुखाचे जावो*

 

नवे संवत्सर

नवे संक्रमण

सुखस्वप्नांचेही

नवेच शिंपण ||

 

कात टाकुनी

सृष्टी नव्याने

बहरून येईल

नव्या जोमाने ||

 

नव्या वाटेवर

सरतील भोग

नव्या दमाचे

नवे उपभोग ||

 

लाभो सकलांना

आरोग्याचा ठेवा

आनंदाने जावे

सौख्याच्या गावा ||

 

सर्वे सन्तु निरामय:

ही मनोमनी प्रार्थना

नवे वर्ष सुखाचे जावो

देते शुभकामना ||

 

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा