You are currently viewing विलवडे शाळा नं.२ शाळेतील विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थीचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप

विलवडे शाळा नं.२ शाळेतील विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थीचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील विलवडे नं.२ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याचे आयोजन उत्कर्ष मंडळ मुंबई (टेंबवाडी) यांनी केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना वह्या, स्कूल बॅग, कंपास, वॉटरबॅग, पेनड्राईव्ह शाळेला संगणक संच, साउंडसिस्टिम आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी उपसभापती कृष्णा सावंत तर बांदा केंद्र प्रमुख संदीप गवस, मंडळाचे अध्यक्ष अरुण सावंत उपस्थित होते. सर्व वि्दयार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा सावंत यांनी उत्कर्ष मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच प्रतिक सावंत व प्रणव दळवी यांचा विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष रश्मी सावंत, उपाध्यक्ष प्राजक्ता दळवी, मोहन सावंत माजी उपसरपंच प्रकाश दळवी, लक्ष्मीकांत सावंत, देवानंद सावंत, आशिका सावंत, लक्ष्मण सावंत, पूर्वा दळवी, मानसी सावंत, समीक्षा सावंत, विश्वास सावंत, सुभाष कानसे, भालचंद्र गवस, महेंद्र सावंत, धनश्री सावंत, माधुरी सावंत, संजय सावंत, समिधा सावंत व उत्कर्ष मंडळाचे सर्व सदस्य, सीमा दळवी, मनाली दळवी व लांबर गुरुजी, शाळेचे सर्व आजी माजी विद्यार्थी, सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश काळे तर आभार सचिन शेळके यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + twenty =