You are currently viewing देवगडातील अवैध धंद्यांविरोधातील आंदोलन तूर्तास स्थगित – नितेश राणे

देवगडातील अवैध धंद्यांविरोधातील आंदोलन तूर्तास स्थगित – नितेश राणे

देवगड

देवगड येथे सुरू असलेल्या अवैद्य धंद्याच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिले आहे. त्यामुळे उद्या होणारे आंदोलन आपण तूर्तास थांबवत आहे, मात्र हा प्रकार न थांबल्यास कोणतीही कल्पना न देता कधीही आंदोलन करेल, अशी भूमिका भाजपचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी मांडली आहे. श्री. राणे यांनी देवगड येथे सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र दरम्यानच्या काळात पोलीस अधीक्षकांशी झालेल्या चर्चेत श्री.अग्रवाल यांनी संबंधित अवैध धंदे मोडीत काढा, अशा सूचना देवगड पोलीस निरीक्षकांना दिल्या होत्या. यावेळी झालेल्या बैठकीत खुद्द श्री. राणे उपस्थित होते.

त्यानंतर अवैद्य धंदे मोडीत काढण्यासाठी योग्य ती कारवाई करू, अशी सकारात्मक भूमिका पोलीस अधीक्षकांकडून घेण्यात आल्यामुळे उद्याचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे श्री. राणे यांनी कळविले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 7 =