You are currently viewing वैभववाडी तालुका कुंभार समाज संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर

वैभववाडी तालुका कुंभार समाज संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर

वैभववाडी तालुका कुंभार समाज संघटना अध्यक्षपदी संदेश तुळसणकर*

*समाज बांधवांना विश्वासात घेऊन काम करणार..! नूतन अध्यक्ष संदेश तुळसणकर यांची ग्वाही*

वैभववाडी प्रतिनिधी

वैभववाडी तालुका कुंभार समाज संघटनेची नूतन कार्यकारणी स्थापन करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी संदेश तुळसणकर उपाध्यक्षपदी अंकुश आंगवलकर सचिव सुधीर कुंभार तर खजिनदारपदी अमित हिंदळेकर यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. गणपत शिरोडकर यांच्या उपस्थितीत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे संपन्न झालेल्या सभेमध्ये कार्यकारणी स्थापन करण्यात आली आहे,नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे…. अध्यक्ष- संदेश तुळसणकर उंबर्डे,उपाध्यक्ष- अंकुश आंगवलकर निम-अरुळे,सचिव -सुधीर कुंभार नाधवडे तर खजिनदारपदी- अमित हिंदळेकर निम-अरुळे,सदस्य सज्जन आंगवलकर,विठोबा कुडाळकर,सुनील गिरकर, सागर कोर्लेकर, प्रमोद गुडेकर, संजय कुंभार, सुरेश कुंभार यांची निवड करण्यात आली आहे.


नूतन कार्यकारणीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री यशवंत शेंदुलकर सरचिटणीस विलास गुडेकर यांनी अभिनंदन केले.
यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील कुंभार समाज बांधव उपस्थित होते कुंभार समाजातील युवक,युवतींना तसेच सर्व कुंभार समाज बांधवांच्या गैरसोई,अडचणी व समस्या दूर करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =